✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७४ ✍️
अतुल ऐश्वर्याला म्हणाला , ” तुझे आता जितके वय आहे त्यात १० वर्षे मिळविले तर माझे तुझ्या जन्माच्या वेळेचे वय मिळेल.”
जर आता अतुल ५६ वर्षांचा असेल तर ऐश्वर्याचे वय किती असेल?
➡️ उत्तर :-
ऐश्वर्याचे वय x वर्षे आहे असे मानू.
➡️ अतुलच्या विधानानुसार,
ऐश्वर्याच्या जन्माच्या वेळी अतुलचे वय = ( x + १० ) वर्षे……(i)
➡️ आज अतुल ५६ वर्षांचा आहे त्यावरून,
ऐश्वर्याच्या जन्माच्या वेळी अतुलचे वय = ( ५६ – x ) वर्षे……(ii)
➡️ समीकरण (i) व (ii) वरून,
∴ x + १० = ५६ – x
∴ x + x = ५६ – १०
∴ २x = ४६
∴ x = ४६ / २
∴ x = २३ वर्षे.
➡️ ऐश्वर्याचे वय २३ वर्षे आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(1) Comment