✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७५ ✍️
मनिषा एकूण पगारातील ८% रक्कम स्कुटीच्या पेट्रोलवर तर एकूण पगाराच्या ४०% रक्कम घरभाड्यासाठी खर्च करते. उर्वरित सर्व रक्कम किराणा सामानासाठी खर्च करते. जर ती ७८०० रुपये किराणा सामानावर खर्च करत असेल तर तिचा महिन्याचा पेट्रोलखर्च किती?
➡️ उत्तर :-
मनिषाचा पगार x रुपये आहे असे मानू.
स्कुटीचा पेट्रोलखर्च = x चे ८% = ₹ ८x/१००
घरभाडे = x चे ४०% = ₹ ४०x/१००
किराणा सामान खर्च = ₹ ७८००
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = (८x/१००) + (४०x/१००) + ७८००
∴ १००x = ८x + ४०x + ७८००००
∴ १००x = ४८x + ७८००००
∴ १००x – ४८x = ७८००००
∴ ५२x = ७८००००
∴ x = ७८००००/५२
∴ x = ₹ १५०००
➡️ आता मनिषाच्या स्कुटीचा पेट्रोलखर्च काढू.
पेट्रोलखर्च
= ८x/१००
= ८ × १५०००/१००
= ८ × १५०
= ₹ १२००
➡️ मनिषाचा स्कुटीचा पेट्रोलखर्च १२०० रुपये आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(5) Comments