✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७७ ✍️
५०० सफरचंदाची किंमत ₹ ८००० आहे तर ५० डझन सफरचंदाची किंमत काढा.
➡️ उत्तर:-
५० डझन सफरचंदाची किंमत x रुपये आहे असे मानू.
५० डझन सफरचंद = ५० × १२ = ६०० सफरचंद.
सफरचंदाची संख्या वाढली की त्यांची किंमतही वाढते. किंवा सफरचंद कमी झाले की किंमतही कमी होते.
∴ येथे समचलन आहे.
➡️ समचलनात गुणोत्तर स्थिर असते.
x/६०० = ८०००/५००
∴ x = ८००० × ६०० / ५००
∴ x = १६ × ६००
∴ x = ₹ ९६००
➡️ ५० डझन सफरचंदाची किंमत ₹ ९६०० आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

