✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १८० ✍️
एक घड्याळ बारा तासांत ५ मिनिटे पुढे जाते. ज सकाळी ठीक १०:०० वाजता ते बरोबर लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी ते दुपारचे ३:०० वाजलेले दाखवत असेल तर प्रत्यक्षात किती वाजलेले असतील?
➡️ उत्तर:-
घड्याळ सकाळी १०:०० वाजता लावले आणि दुसऱ्या दिवशी त्यात तीन वाजले आहेत.
म्हणजे त्या घड्याळात २९ तास झाले आहेत.
या घड्याळातील १२ तास ५ मिनिटे = प्रत्यक्षातील १२ तास
∴ या घड्याळातील ( १२ + १/१२) तास = प्रत्यक्षातील १२ तास
∴ या घड्याळातील ( १४५/१२) तास = प्रत्यक्षातील १२ तास
∴ या घड्याळातील १ तास = प्रत्यक्षातील ( १२ × १२/१४५) तास
∴ या घड्याळातील २९ तास = प्रत्यक्षातील ( २९ × १२ × १२/१४५) तास
∴ या घड्याळातील २९ तास = प्रत्यक्षातील १४४/५ तास
∴ या घड्याळातील २९ तास = प्रत्यक्षातील २८.८ तास
∴ या घड्याळातील २९ तास = प्रत्यक्षातील २८ तास आणि ०.८×६० मिनिटे
∴ या घड्याळातील २९ तास = प्रत्यक्षातील २८ तास आणि ४८ मिनिटे.
घड्याळ १०:०० वाजता बरोबर लावले होते त्यानंतर २८ तास ४८ मिनिटे म्हणजे २:४८ म. उ.
➡️ त्या घड्याळात ३:०० वाजलेले असतील तर प्रत्यक्षात २:४८ म.उ. वाजले आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

