✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६१ ✍️
रंगाचे एक पाकीट ३० रुपयांना विकून आकाश ५०% नफा मिळवीत असे. परंतु कोविड – १९ च्या भीतीने लोक धुळवडीसाठी रंग खरेदी कमी करू लागल्यामुळे आहे तो माल संपविण्यासाठी त्याने आधीच्या विक्री किमतीवर ( ₹ ३०) पाकिटामागे ३०% डिस्काऊंट द्यायला सुरुवात केली. तर या व्यवहारात दर पाकिटामागे त्याला नफा वा तोटा किती होईल?
➡️ उत्तर :-
पाकिटाची खरेदी किंमत १०० रुपये मानू.
नफा = ५०%
➡️ म्हणून
पाकिटाची विक्री किंमत = १५० रुपये.
पाकिटाची मूळ खरेदी किंमत = (१०० / १५० ) × ३०
पाकिटाची मूळ खरेदी किंमत = ₹ २०
➡️ आता,
विक्री किमतीवर ३०% डिस्काउंट दिला.
म्हणून,
डिस्काउंट = ३० चे ३०%
डिस्काउंट = ३० × ३०/१००
डिस्काउंट = ₹ ९
➡️ म्हणून
पाकिटाची विक्री किंमत = ३० – ९ = ₹ २१.
नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
नफा = २१ – २०
नफा = ₹ १
➡️ म्हणून,
शेकडा नफा = (नफा / खरेदी किंमत ) × १००
शेकडा नफा = ( १/ २०)× १००
शेकडा नफा = ५
म्हणून या व्यवहारात आकाशला ५% नफा होईल.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

