✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६२ ✍️
टी२० च्या एका सामन्यात भारतीय संघाने पहिल्या पाच षटकात ४.८ च्या रन रेट ने धावा केल्या. जर विजयासाठी एकूण १५९ धावा हव्या असतील तर उर्वरित षटकांत भारताने कमीतकमी किती रन रेट ठेवले पाहिजे?
➡️ उत्तर :-
पहिल्या पाच षटकात झालेल्या धावा = ४.८ × ५ = २४
विजयासाठी हव्या असणाऱ्या एकूण धावा = १५९
➡️ म्हणून,
जिंकण्यासाठी उर्वरित षटकांत करावयाच्या धावा = १५९ – २४ = १३५
रनरेट = १३५ / १५
रनरेट = ९
➡️ म्हणून सामना जिंकण्यासाठी भारताने कमीतकमी ९ रनरेट ठेवले पाहिजे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

