✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६५ ✍️
१०० मीटर च्या शर्यतीत अमित सुमितला २ मीटर ने तर परमितला ९ मीटर ने हरवतो. जर शर्यत २८० मीटरची असेल तर सुमित परमितला किती मीटरने हरवेल?
➡️ उत्तर :-
अमित : सुमित = १०० : ९८
अमित : परमित = १०० : ९१
➡️ म्हणून,
सुमित : परमित = ९८ : ९१
सुमित : परमित = १४ : १३
➡️ दिलेल्या अटीनुसार,
सुमित जेंव्हा २८० मीटर ची शर्यत पूर्ण करेल तेंव्हा परमितने कापलेले अंतर
= (१३/१४ )× २८०
= १३ × २०
= २६० मी.
➡️ सुमित व परमित यांच्यातील अंतर = २८० – २६० = २० मी
म्हणून सुमित परमितला २० मीटरने हरवेल.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

