✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६८ ✍️
एका कंपनीतील २५ अधिकाऱ्यांचा सरासरी पगार ४०००० रुपये आहे. त्यात एका महाव्यवस्थापकांचा पगार मिळविल्यास सरासरी तीन हजाराने वाढते. तर महाव्यवस्थापकांचा पगार किती?
➡️ उत्तर :-
२५ अधिकाऱ्यांचा एकूण पगार x रुपये तर महाव्यवस्थापकांचा पगार y रुपये आहे असे मानू.
➡️ पहिल्या अटीनुसार,
x / २५ = ४०,०००
x = ४०,००० × २५
x = १०,००,००० ……..(i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
( x + y )/२६ = ४३,०००
x + y = २६ × ४३,०००
१०,००,००० + y = ११,१८,००० ……(i वरून)
y = ११,१८,००० – १०,००,०००
y = १,१८,००० रुपये.
➡️ म्हणून महाव्यवस्थापकांचा पगार १,१८,००० रुपये आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

