✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७१ ✍️
२० डझन आंब्याच्या खरेदी किमतीएवढ्या रकमेला आशाने १६ डझन आंबे विकले तर या व्यवहारात तिला किती टक्के नफा झाला?
➡️ उत्तर :-
एक डझन आंब्याची किंमत ₹ १ मानू.
➡️ म्हणून,
२० डझन आंब्याची किंमत = ₹ २०
१६ डझन आंब्याची किंमत = ₹ १६
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
नफा = २० – १६
नफा = ₹ ४
➡️ म्हणून,
शे. नफा = (नफा / खरेदी किंमत)१००
शे. नफा = ( ४/१६) १००
शे. नफा = २५
म्हणून या व्यवहारात आशाला २५% नफा झाला.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

