✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८४ ✍️
एक डझन देवगड हापूस आंब्याच्या पेटीतून २४० ग्रॅम वजनाचा आंबा काढून त्यात नवीन आंबा टाकला असता पेटीतील आंब्याचे सरासरी वजन ५ ग्रॅम ने वाढते तर नवीन आंब्याचे वजन किती?
➡️ उत्तर :-
एक डझन आंब्याचे सरासरी वजन x ग्रॅम तर नवीन आंब्याचे वजन y ग्रॅम मानू.
➡️ म्हणून,
एक डझन आंब्याचे एकूण वजन = १२x ग्रॅम
काढलेल्या आंब्याचे वजन = २४० ग्रॅम तर नवीन आंब्याचे वजन y ग्रॅम
➡️ म्हणून,
नवीन एक डझन आंब्याचे वजन = (१२x – २४०) + y ग्रॅम.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
१२x – २४० + y – १२x = ६०
y = ६० + २४०
y = ३०० ग्रॅम
म्हणून नवीन आंब्याचे वजन ३०० ग्रॅम आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

