✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८५ ✍️
तीन संख्यांपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज ३५ आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज ४५ आहे तर पहिल्या संख्येची चौपट दुसऱ्या संख्येच्या तिपटीएवढी आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती?
➡️ उत्तर :-
त्या तीन संख्या x , y आणि z आहेत असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x + y = ३५ ……..(i)
y + z = ४५ ………(ii)
आणि,
४x = ३y
➡️ म्हणून,
y = ४x/३ ……..(iii)
➡️ समीकरण (i) व (iii) वरून,
x + ४x/३ = ३५
३x + ४x = १०५ …..(समिकरणास ३ ने गुणून)
७x = १०५
x = १०५/७
x = १५
➡️ x = १५ ही किंमत समीकरण(i) मध्ये ठेवून,
१५ + y = ३५
y = ३५ – १५
y = २०
➡️ y = २० ही किंमत समीकरण(ii) मध्ये ठेवून,
२० + z = ४५
z = ४५ – २०
z = २५
➡️ म्हणून,
पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज = x + z = १५ + २५ = ४०
म्हणून पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज ४० आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

