✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८८ ✍️
एक हौद ५/८ भरलेला आहे. १५ लिटर क्षमतेच्या ५ बादल्या त्यात ओतल्यावर तो ३/४ भरतो तर त्या हौदाची क्षमता किती लिटर आहे?
➡️ उत्तर :-
हौदाची क्षमता x लिटर आहे असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(५/८)x + ५ बादल्या = (३/४)x
५ बादल्या = (३/४)x – (५/८)x
५ बादल्या = (६/८)x – (५/८)x
५ बादल्या = (१/८)x
➡️ म्हणून,
x = ८ × ५ बादल्या
x = ४० बादल्या
x = ४० × १५ लिटर
x = ६०० लिटर
➡️ म्हणून त्या हौदाची क्षमता ६०० लिटर आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

