✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९७ ✍️
रमेश आणि हिमेश एक काम १४ दिवसांत पूर्ण करतात. रमेशचा कामाचा वेग हिमेशच्या निम्माच असेल तर तो (रमेश) तेच काम एकट्याने किती दिवसांत पूर्ण करेल?
➡️ उत्तर :-
रमेश ते काम एकट्याने x दिवसांत पूर्ण करेल असे मानू.
➡️ म्हणून,
रमेशने एका दिवसात केलेले काम = १/x
हिमेशच्या कामाचा वेग रमेशच्या कामाच्या दुप्पट आहे.
➡️ म्हणून,
हिमेशने एका दिवसात केलेले काम = २/x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(१/x) + (२/x) = १/१४
३/x = १/१४
x = १४×३
x = ४२ दिवस
म्हणून रमेशला एकट्याने ते काम करण्यासाठी ४२ दिवस लागतील.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

