✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३ ✍️
एका व्यापाऱ्याने ७० रुपये किलो किमतीच्या २० किलो तांदळाच्या गोणीमध्ये ५५ रुपये किलो किमतीचे तांदूळ मिसळले आणि ते तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा कमावला. तर त्याने ५५ रुपये किलोचे किती किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते?
➡️ उत्तर :-
५५ रुपये किलोचे x किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते असे मानू.
➡️ म्हणून,
x किलो तांदळाची खरेदी किंमत = ₹ ५५x
२० किलो तांदळाची खरेदी किंमत = २० × ७० = ₹ १४००
➡️ ५५ रुपये किलोचे x किलो तांदूळ त्या गोणीत मिसळल्यानंतर
१ किलो तांदळाची खरेदी किंमत = (५५x + १४००) / (x + २०)…(i)
गोणीतील तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा मिळवला आहे.
आपल्याला माहिती आहे की,
नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
आणि
शेकडा नफा = १०० × नफा / खरेदी किंमत
२० = १००( विक्री किंमत – खरेदी किंमत) / खरेदी किंमत
२० × खरेदी किंमत = १००(७२ – खरेदी किंमत)
२० × खरेदी किंमत = ७२०० – १०० × खरेदी किंमत
२० × खरेदी किंमत + १०० × खरेदी किंमत = ७२००
१२० × खरेदी किंमत = ७२००
खरेदी किंमत = ७२००/१२०
➡️ म्हणून,
१ किलो तांदळाची किंमत = ₹ ६०…..(ii)
➡️ समीकरण (i) व (ii) वरून
६० = (५५x + १४००)/ (x + २०)
६०(x + २०) = (५५x + १४००)
६०x + १२०० = ५५x + १४००
६०x – ५५x = १४०० – १२००
५x = २००
x = २००/५
x = ४०
➡️ म्हणून ५५ रुपये किलोचे ४० किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

