✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११४ ✍️
संध्याने वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना वाटण्यासाठी १०५ चॉकलेट्स आणली होती. मुले कमी येतील असे वाटून तिने त्यावेळी उपस्थित सर्व मुलांना प्रत्येकी तीन चॉकलेट्स वाटून स्वतः ही तीन चॉकलेट्स घेतली . परंतु पाचच मिनिटांत आणखी काही मुलांचा घोळका तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर झाला. गोंधळून न जाता संध्याने फटाफट आकडेमोड करून नंतर आलेल्या सर्व मुलांना प्रत्येकी दोन चॉकलेट्स वाटले. जर तिथे संध्यासहित एकूण ४० मुले असतील तर नंतर आलेला घोळका किती मुलांचा होता?
➡️ उत्तर :-
नंतर आलेली मुले x तर सुरुवातीला असलेली मुले y मानू.
➡️ पहिल्या अटीनुसार,
२x + ३y = १०५……. (i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
x + y = ४०……….(ii)
∴ ३x + ३y = १२०……(iii) (समी. ii ला ३ ने गुणून)
➡️ समी (iii) मधून समी (ii) वजा करू
३x + ३y = १२०
– २x + ३y = १०५
(-) (-) (-)
————————-
x = १५
➡️ म्हणून नंतर १५ मुले आली होती.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

