✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१ ✍️
घराच्या नूतनीकरणाचे काम ८ मजुरांनी काही दिवसात पूर्ण करून द्यायचे कबूल केले. प्रत्यक्ष कामाच्या दिवशी ३ मजूर गैरहजर राहिले त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशीर झाला. जर सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असते?
➡️ उत्तर :-
सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास x दिवस लागले असते असे मानू.
➡️म्हणून,
८ मजुरांनी केलेले एकूण काम = ८x
परंतु,
प्रत्यक्ष कामाच्या वेळी ३ मजूर गैरहजर राहिले.
➡️म्हणून,
५ मजुरांनी केलेले एकूण काम = ५ (x + ३)
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
८x = ५ ( x + ३ )
∴ ८x = ५x + १५
∴ ८x – ५x = १५
∴ ३x = १५
∴ x = १५/३
∴ x = ५ दिवस.
➡️म्हणून सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर ते काम ५ दिवसात पूर्ण झाले असते.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

