✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४१ ✍️
एक विक्रेता त्याच्या मालाची किंमत खरेदी किमतीच्या २५% जास्त लावतो. त्या छापील किमतीवर काही डिस्काऊंट देऊन त्या वस्तूवर १०% नफा कमावतो. तर तो विक्रेता त्या वस्तूवर किती टक्के डिस्काऊंट देतो?
➡️ उत्तर :-
मालाची खरेदी किंमत x रुपये आहे असे मानू.
∴ मालाची छापील किंमत = x + x चे २५%
∴ मालाची छापील किंमत = x + x × २५/१००
∴ मालाची छापील किंमत = (१०० x + २५x)/१००
∴ मालाची छापील किंमत = १२५x/१००…….(i)
➡️ विक्रेता तो माल विकून १०% नफा कमावतो
∴ मालाची विक्री किंमत = x + x चे १०%
∴ मालाची विक्री किंमत = x + x × १०/१००
∴ मालाची विक्री किंमत = (१००x + १०x)/१००
∴ मालाची विक्री किंमत = ११०x/१००……(ii)
➡️ आपल्याला माहिती आहे की,
डिस्काऊंट = छापील किंमत – विक्री किंमत
∴ डिस्काऊंट = (१२५x/१००) – ( ११०x/१००)..(समी i व ii वरून )
∴ डिस्काऊंट = १५x/१००
∴ डिस्काऊंटची टक्केवारी =[(१५x/१००)/ (१२५x/१००)] × १००
∴ डिस्काऊंटची टक्केवारी = (१५/१२५) × १००
∴ डिस्काऊंटची टक्केवारी = १२
➡️ विक्रेता त्या मालावर १२% डिस्काऊंट देतो.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

