✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४५ ✍️
अब्दुलकडे ७ घोडे आहेत तर कादिरकडे ९ खेचरे आहेत. या सर्व प्राण्यांचे एकूण मूल्य ६२,००० रुपये आहे. जर अब्दुलने कादिरला दोन घोडे दिले आणि कादिरने अब्दुलला दोन खेचरे दिली तर त्या दोघांकडे असणाऱ्या प्राण्यांचे मूल्य समान होते. तर एका घोड्याचे मूल्य किती?
➡️ उत्तर :-
एका घोड्याचे मूल्य x रुपये तर एका खेचराचे मूल्य y रुपये आहे असे मानू.
➡️ पहिल्या अटीनुसार,
७x + ९y = ६२०००……..(i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
५x + २y = ७y + २x
∴ ५x – २x = ७y – २y
∴ ३x = ५y
∴ ३x – ५y = ० …….(ii)
➡️ समीकरण (i) ला ५ ने तर समीकरण (ii) ला ९ ने गुणून
३५x + ४५y = ३१००००……(iii)….(i वरून)
२७x – ४५y = ० ……..(iv) ……..(ii वरून )
➡️ समीकरण (iii) व समीकरण (iv) ची बेरीज करून
६२x = ३१००००
∴ x = ३१००००/६२
∴ x = ५०००
➡️ एका घोड्याचे मूल्य ५००० रुपये आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(1) Comment