✍️गणिताशी गट्टी क्र.३६✍️
एका व्यापाऱ्याने आपल्या जवळील ३०० किलो तांदुळापैकी काही १५% नफ्याने तर उर्वरित २५% नफ्याने विकले. या संपूर्ण व्यवहारात जर त्याला १८% नफा झाला असेल तर त्याने २५% नफ्याने किती किलो तांदूळ विकले?
➡️ त्या व्यापाऱ्याने x किलो तांदूळ १५% नफ्याने तर २५% नफ्याने y किलो तांदूळ विकले असे मानू.
➡️ पहिल्या अटीवरून,
x + y = ३०० ……(i)
➡️ दुसऱ्या अटीवरून,
१५%x + २५%y = १८%(x + y )
१५x/१०० + २५y/१०० = १८(x + y )/१००
१५x + २५y = १८ (x + y ) ……( १०० ने गुणून )
१५x + २५y = १८x + १८y
१५x – १८x + २५y – १८y = ०
-३x + ७y = ० …….(ii)
➡️ समीकरण (i) ला ३ ने गुणून
३x + ३y = ९०० ……(iii)
➡️ समीकरण (i) व समीकरण (iii) यांची बेरीज करून
१०y = ९००
y = ९००/१०
y = ९०
➡️ म्हणून त्या व्यापाऱ्याने २५% नफ्याने ९० किलो तांदूळ विकले.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

