✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४५✍️
माधवरावांनी चार चाकी गाडी विकत घेण्यासाठी बँकेतून द.सा. द. शे. ९ दराने ५ वर्ष मुदतीचे सरळव्याजाने कर्ज घेतले. जर या कर्जापोटी नव्वद हजार रुपये व्याज भरावे लागले असेल तर माधवरावांनी किती रकमेचे कर्ज काढले होते?
➡️उत्तर :-
सरळव्याज = ₹ ९००००
व्याजदर ( द ) = द. सा. द. शे. ९
मुदत ( क ) = ५ वर्षे
मुद्दल ( म ) = ?
आपल्याला माहिती आहे की,
सरळव्याज = म × द × क / १००
➡️ यावरून,
मुद्दल ( म ) = ( सरळव्याज × १०० ) / ( द × क )
मुद्दल = ( ९०००० × १०० )/( ९ × ५ )
मुद्दल = १०००० × २०
मुद्दल = ₹ २,००,०००
➡️ म्हणून माधवरावांनी बँकेतून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

