✍️गणिताशी गट्टी-१६✍️
✍️एका गोठ्यात काही व्यक्ती व गायी आहेत. त्या गोठ्यात २७ डोकी आणि ९६ पाय आहेत. जर गोठ्यात पायाने दिव्यांग व्यक्ती किंवा गाय नसेल तर तिथे एकूण किती गायी आहेत ?
➡️व्यक्तींची संख्या x तर गायीची संख्या y मानू.
पहिल्या अटीवरून,
x + y = २७ …….( i )
दुसऱ्या अटीवरून,
२x + ४y = ९६ …….( ii )
➡️समीकरण ( i ) ला २ ने गुणून,
२x + २y = ५४ ……..( iii )
➡️समीकरण ( ii ) मधून समीकरण ( iii ) वजा करून,
२y = ४२
y = ४२/२
y = २१
➡️म्हणून त्या गोठयात २१ गायी आहेत.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

