✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४९ ✍️
१०० मीटरच्या शर्यतीत संजय आणि गोपाळ भाग घेतात. ३० किमी प्रतितास या वेगाने धावून संजय गोपाळला ३ सेकंदाने हरवतो. तर गोपाळचा धावण्याचा वेग काढा.
➡️ उत्तर :-
गोपाळचा धावण्याचा वेग x किमी प्रतितास आहे असे मानू.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / वेळ
१००० मी = १ किमी
∴ १०० मी = ०.१ किमी …….( १० ने भागून )
तसेच
६० मिनिटे = १ तास
∴ ६० × ६० सेकंद = १ तास ……( १ मिनिट = ६० सेकंद )
∴ १ सेकंद = ( १ / ३६०० ) तास
∴ ३ सेकंद = ( १ / १२०० ) तास …….( ३ ने गुणून )
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(०.१ / ३०) + (१ /१२०० ) = ०.१ / x
∴ ( ४ + १ ) / १२०० = ०.१ / x
∴ ५ / १२०० = ०.१ / x
∴ ५ × x = १२०० × ०.१ …….( तिरकस गुणाकार करून )
∴ ५x = १२०
∴ x = १२० /५
∴ x = २४ किमी प्रतितास.
➡️ गोपाळचा धावण्याचा वेग २४ किमी प्रतितास आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७९२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(1) Comment