✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५३ ✍️
ऋतुजाने ५ आणि १० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण ३०० रुपये आदिनाथला वाढदिवसानिमित्त भेट दिले. आदिनाथ ऋतुजाला म्हणाला तू जितक्या ५ रुपयांच्या नोटा दिल्या तितक्या १० रुपयांच्या दिल्या असत्या अन जितक्या १० रुपयांच्या नोटा दिल्या तितक्या ५ रुपयांच्या दिल्या असत्या तर मला २७० रुपये मिळाले असते. तर ऋतुजाने आदिनाथला १० रुपयांच्या किती नोटा दिल्या?
➡️ उत्तर :-
ऋतुजाने आदिनाथला ५ रुपयांच्या x नोटा तर १० रुपयांच्या y नोटा दिल्या असे मानू.
➡️ पहिल्या अटीनुसार,
५x + १०y = ३०० ……….(i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
१०x + ५y = २७० …….(ii)
समीकरण (i) ला २ ने गुणून
∴ १०x + २०y = ६०० …….(iii)
➡️ समीकरण (iii) मधून समीकरण (ii) वजा करून,
१५y = ३३०
∴ y = ३३०/१५
∴ y = २२
➡️ ऋतुजाने आदिनाथला दहा रुपयांच्या २२ नोटा दिल्या.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

