✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५४ ✍️
एका शाळेतील ६० मुली व ४० मुले नववीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५% मुली आणि ५% मुले परीक्षेत नापास झाले. तर त्या शाळेचा नववीचा निकाल किती लागला?
➡️ उत्तर :-
शाळेचा नववीचा निकाल x% लागला असे मानू.
परीक्षेत पास झालेल्या मुली
= ६० चे ९५%
= ६० × ९५/१००
= ३ × १९
= ५७
परीक्षेत पास झालेली मुले
= ४० चे ९५%
= ४० × ९५/१००
= २ × १९
= ३८
∴ नववीच्या परीक्षेत पास झालेले एकूण विद्यार्थी = ५७ + ३८ = ९५
आता,
शाळेचा नववीचा निकाल
= ( पास झालेले विद्यार्थी/परीक्षेला बसलेले विद्यार्थी) × १००
∴ x = ( ९५/१००) × १००
∴ x = ९५
➡️ शाळेचा नववीचा निकाल ९५% लागला.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

