✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५९ ✍️
सानिकाला नववीत इंग्रजी विषयात ८७ गुण मिळाले. दहावीच्या सरावपरीक्षेत इंग्रजी विषयात ८० पैकी ७३ गुण मिळाले. परंतु दहावीची परीक्षा कोरोना काळात रद्द झाल्यामुळे इंग्रजी विषयाचे गुण देण्यासाठी पुढील पद्धती अवलंबली गेली. नववीच्या १०० पैकी मिळालेल्या गुणांचे ५० गुणात रूपांतर, दहावीच्या सराव परीक्षेच्या ८० पैकी मिळालेल्या गुणांचे ३० गुणात रूपांतर, दहावीत २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन असे ( ५० + ३० + २० ) १०० गुण. रूपांतर करताना उत्तर अपूर्णांकात आले तर पुढील संख्या घ्यावी.(उदा.८० गुणांचे ३० गुणात रूपांतर करताना २२.०१ असे उत्तर आले तर ते २३ घ्यावे.) जर सानिकाला दहावीत ९० गुण मिळाले असतील तर तिला दहावी अंतर्गत मूल्यमापनामध्ये किती गुण मिळाले?
➡️ उत्तर :-
सानिकाला दहावी अंतर्गत मूल्यमापनामध्ये x गुण मिळाले असे मानू.
➡️ सानिकाला नववीमध्ये इंग्रजीत मिळालेले गुण = १०० पैकी ८७
∴ या गुणांचे ५० पैकी गुणांत रूपांतर = ८७ / २ = ४३.५ = ४४
➡️ सानिकाला दहावीच्या सरावपरीक्षेत इंग्रजी विषयात ८० पैकी ७३ गुण मिळाले.
तर ३० पैकी y गुण मिळतील असे मानू.
∴ y = ७३ × ३०/८०
∴ y = ७३ × ३/८
∴ y = ७३ × ०.३७५
∴ y = २७.३७५
∴ y = २८
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
४४ + २८ + x = ९०
∴ ७२ + x = ९०
∴ x = ९० – ७२
∴ x = १८
➡️ सानिकाला दहावी अंतर्गत मूल्यमापनामध्ये १८ गुण मिळाले.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

