✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६४ ✍️
९ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पुरात ताशी ६ किमी वेगाने पोहणाऱ्या भीमाने उडी घेतली अन प्रवाहाच्या दिशेने पोहू लागला तर अर्धा किमी अंतर पोहून जाण्यासाठी भीमाला किती वेळ लागेल?
➡️ उत्तर :-
अर्धा किमी अंतर पोहून जाण्यासाठी भीमाला x तास वेळ लागेल असे मानू.
नदीच्या प्रवाहाचा वेग = ९ किमी प्रतितास
भीमाचा पोहोण्याचा वेग = ६ किमी प्रतितास
∴ प्रवाहाच्या दिशेने भीमाचा पोहोण्याचा वेग = ९ + ६ = १५ किमी प्रतितास
➡️ आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / वेळ
∴ वेळ = अंतर / वेग
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = ०.५ / १५
∴ x = ५ / १५०
∴ x = १/३० तास
∴ x = ( १/३० ) × ६० मिनिटे
∴ x = २ मिनिटे
➡️ म्हणून अर्धा किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने पोहून जाण्यासाठी भीमाला २ मिनिटे लागतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

