✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६६ ✍️
अक्षय ने स्थानिक क्रिकेटच्या सामन्यात सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ८० धावा केल्या तर त्यात पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती?
उत्तर :-
अक्षयने पळून काढलेल्या धावांची टक्केवारी x आहे असे मानू.
अक्षयने काढलेल्या एकूण धावा = ८०
चौकार षटकाराच्या साहाय्याने काढलेल्या धावा = ६ × ४ + ४ × ६ = २४ + २४ = ४८
∴ पळून काढलेल्या धावा = ८० – ४८ = ३२.
➡️ म्हणून,
x = ( ३२/८०) × १००
∴ x = ४ × १०
∴ x = ४०
➡️ अक्षयने ४०% धावा पळून काढल्या.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

