✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७० ✍️
विक्री किंमत तिप्पट केली असता नफा चौपट होतो. तर शेकडा नफा किती?
➡️ उत्तर :-
खरेदी किंमत x रुपये तर विक्री किंमत y रुपये मानू.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
∴ नफा = y – x रुपये …….(i)
आता,
विक्री किंमत तिप्पट केल्यानंतर होणारा नफा = ३y – x रुपये ….(ii)
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
४ ( y – x ) = ३y – x
∴ ४y – ४x = ३y – x
∴ ४y – ३y = ४x – x
∴ y = ३x …….(iii)
➡️ समीकरण (i) व (iii) वरून,
नफा = ३x – x
∴ नफा = २x रुपये.
➡️ शेकडा नफा = ( नफा / खरेदी किंमत ) × १००
∴ शेकडा नफा = ( २x / x ) × १००
∴ शेकडा नफा = २००
➡️ विक्री किंमत तिप्पट केली असता नफा चौपट होतो. तर नफा २००% होईल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

