✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७२ ✍️
गौरव काम करत असलेल्या कंपनीत पाच दिवसांचा आठवडा असून रोज आठ तास करावे लागते. नियमित कामांसाठी २६० रुपये प्रतितास प्रमाणे तर जादा काम ( ओव्हर टाईम ) केले तर ३०० रुपये प्रतितास प्रमाणे वेतन मिळते. गौरवचा चार आठवड्याअंती ५०००० रुपये मिळत असतील तर त्याने किती तास जादा काम ( ओव्हर टाईम ) केले?
➡️ उत्तर :-
गौरवने x तास जादा काम केले असे मानू.
∴ गौरवला जादा काम केल्यामुळे मिळालेली रक्कम = ₹ ३००x
तसेच,
गौरवला नियमित कामाची मिळालेली रक्कम
= २६० × ८ × २०
= २६० × १६०
= ₹ ४१,६००
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
४१,६०० + ३००x = ५०,०००
∴ ३००x = ५०,००० – ४१,६००
∴ ३००x = ८४००
∴ x = ८४००/३००
∴ x = २८ तास
➡️ गौरवने २८ तास जादा काम केले.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

