✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६० ✍️
अक्षयने बँकेकडून द. सा. द. शे. १२ दराने काही रक्कम सरळव्याजाने कर्जाऊ घेतली. तीन वर्षांच्या व्याजापोटी त्याने ७२०० रुपये भरले असतील तर अक्षयने बँकेतून किती रुपयांचे कर्ज काढले होते ?
➡️ उत्तर :-
अक्षयने बँकेकडून x रुपयांचे कर्ज काढले होते असे मानू.
मुद्दल = म = x रुपये
व्याजदर = द = द. सा. द. शे. १२
मुदत = क = ३ वर्षे
सरळव्याज = ७२०० रुपये.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
सरळव्याज = ( म × द × क ) /१००
➡️ म्हणून,
म = ( सरळव्याज × १०० )/( द × क )
x = ( ७२०० × १०० )/( १२ × ३)
x = २०० × १००
x = २०,००० रुपये.
➡️ म्हणून अक्षयने बँकेतून २०००० रुपयांचे कर्ज घेतले होते.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

