✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६४ ✍️
चार चार वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या भाऊच्या चार मुलांच्या वयाची बेरीज ६० वर्षे आहे तर त्याच्या सर्वात मोठ्या मुलाचे वय किती?
➡️ उत्तर :-
सर्वात मोठ्या मुलाचे वय x वर्षे आहे असे मानू.
➡️ म्हणून,
दुसऱ्या मुलाचे वय = ( x – ४) वर्षे
तिसऱ्या मुलाचे वय = ( x – ८) वर्षे
चौथ्या मुलाचे वय = ( x – १२) वर्षे
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x + ( x – ४) + ( x – ८) + ( x – १२) = ६०
x + x – ४ + x – ८ + x – १२ = ६०
४x – २४ = ६०
४x = ६० + २४
४x = ८४
x = ८४ / ४
x = २१ वर्षे
➡️ म्हणून सर्वात मोठ्या मुलाचे वय २१ वर्षे आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

