✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६६ ✍️
एका कुटुंबकर्त्याने तयार केलेल्या एकूण बटाटावड्यापैकी दोन पंचमांश भाग स्वतःसाठी घेतला व उर्वरित भाग सर्व सदस्यांना समान वाटला. जर कर्त्याला प्रत्येक सदस्याला मिळालेल्या वाट्याच्या दुप्पट वाटा मिळाला असेल तर त्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत?
➡️ उत्तर :-
त्या कुटुंबात एकूण x सदस्य आहेत असे मानू.
कुटुंबकर्त्याने स्वतःसाठी ठेवलेला भाग = २/५
उर्वरित सदस्यासाठी राहिलेला भाग = ३/५
प्रत्येक सदस्याला मिळालेला वाटा = ३/[५(x – १)]
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
२ { ३/[५(x – १)] } = २/५
३/(x – १) = १
x – १ = ३
x = ३ + १
x = ४
➡️ म्हणून त्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

