✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.४०✍️
अजय, विजय आणि सुजयने मिळून एक कार ₹५२०० देऊन भाड्याने घेतली. जर त्यांनी ती अनुक्रमे ७, ८ आणि ११ तास वापरली असेल तर विजयने किती भाडे द्यायला हवे?
उत्तर :-
➡️दिलेल्या माहितीनुसार,
अजय, विजय आणि सुजय यांचे कार वापरण्याचे प्रमाण = ७ : ८ : ११
तर कारचे एकूण भाडे = ₹ ५२००
➡️म्हणून,
विजयला भाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम
= ₹ ५२०० × ( ८/ २६)
= ₹ २०० × ८
= ₹ १६००
➡️ म्हणून विजयला कारच्या भाड्यापोटी १६०० रुपये द्यावे लागतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

