✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६९ ✍️
आफताब आपली मुलगी नूरी हिला म्हणाला, पाच वर्षांपूर्वी माझे वय तुझ्या त्या वेळच्या वयाच्या पाचपट होते. आजपासून तीन वर्षांनंतर माझे वय तुझ्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होईल तर माझे आजचे वय किती आहे?
➡️ उत्तर :-
आफताबचे आजचे वय x वर्षे तर नूरीचे आजचे वय y वर्षे मानू.
पाच वर्षांपूर्वी,
आफताबचे वय = ( x – ५ ) वर्षे.
नूरीचे वय = ( y – ५ ) वर्षे.
तीन वर्षांनंतर,
आफताबचे वय = ( x + ३ ) वर्षे
नूरीचे वय = ( y + ३ ) वर्षे
➡️ पहिल्या अटीनुसार,
( x – ५ ) = ५ ( y – ५ )
x – ५ = ५y – २५
x – ५y = ५ – २५
x – ५y = – २०
x = ५y – २० ……..(i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
( x + ३ ) = ३ ( y + ३ )
x + ३ = ३y + ९
x – ३y = ९ – ३
x – ३y = ६ ……….(ii)
➡️ x = ५y – २० ही किंमत समीकरण(ii) मध्ये ठेवून,
५y – २० – ३y = ६
२y = ६ + २०
y = २६ / २
y = १३ वर्षे.
➡️ y = १३ ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
x = ५(१३) – २०
x = ६५ – २०
x = ४५ वर्षे.
➡️म्हणून आफताबचे आजचे वय ४५ वर्षे आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

