✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४२ ✍️
राजश्रीला तिच्या वडिलांनी नवीन वर्षानिमित्त १०० च्या काही नोटा व ५०० च्या काही नोटा मिळून ५००० रुपये भेट दिले. तेंव्हा राजश्री आपल्या वडिलांना म्हणाली तुम्ही मला जेवढ्या पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या तेवढ्या १०० रुपयांच्या दिल्या असत्या आणि जितक्या शंभर रुपयांच्या नोटा दिल्या तितक्याच ५०० रुपयांच्या नोटा दिल्या असत्या तर मला आता मिळाले त्यापेक्षा आठशे रुपये अधिक मिळाले असते. तर राजश्रीला तिच्या वडिलांनी ५०० रुपयाच्या किती नोटा दिल्या होत्या?
उत्तर :-
राजश्रीला तिच्या वडिलांनी १०० रुपयांच्या x नोटा तर ५०० रुपयांच्या y नोटा दिल्या होत्या असे मानू.
➡️ पहिल्या अटीवरून,
१००x + ५००y = ५०००
x + ५y = ५० …….. [समिकरणास १०० ने भागून ]
➡️म्हणून
x = ५० – ५y ………(i)
➡️ दुसऱ्या अटीवरून,
५००x + १००y = ५८००
५x + y = ५८ ……( समिकरणास १०० ने भागून )
➡️ म्हणून,
५( ५० – ५y ) + y = ५८ …….( समीकरण i वरून)
२५० – २५y + y = ५८
– २४y = ५८ – २५०
– २४y = – १९२
y = -१९२ / -२४
y = ८
➡️म्हणून राजश्रीला तिच्या वडिलांनी ५०० रुपयांच्या ८ नोटा दिल्या होत्या.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

