✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४४ ✍️
मनीषने पनवेलजवळील आपले फार्महाऊस व पनवेलमधील घर प्रत्येकी तीस लाख रुपयांत विकले. घरविक्रीत त्याला २० % नफा तर फार्महाऊस विक्रीत त्याला २०% तोटा झाला. तर या संपूर्ण व्यवहारात मनीषला………झाला.
➡️उत्तर :-
घराची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.
नफा = २०%
➡️म्हणून
घराची विक्री किंमत = ₹ १२०
जर घराची विक्री किंमत तीस लाख असेल तर त्याची खरेदी किंमत
= १०० × ३० लाख / १२०
= २५ लाख
➡️घराची खरेदी किंमत = २५ लाख रुपये ……..(i)
फार्म हाऊसची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.
तोटा = २०%
➡️म्हणून
फार्म हाऊसची विक्री किंमत = ₹ ८०
जर फार्म हाऊसची विक्री किंमत तीस लाख असेल तर त्याची खरेदी किंमत
= १०० × ३०,००,०००/ ८०
= ३७,५०,०००
➡️फार्म हाऊसची खरेदी किंमत = ₹ ३७, ५०, ००० ……..(ii)
म्हणून,
➡️घर व फार्म हाऊसची एकूण खरेदी किंमत
= २५,००,००० + ३७, ५०,०००
= ₹६२,५०,०००
➡️घर व फार्म हाऊसची एकूण विक्री किंमत
= २ × ३०,००,०००
= ₹६०,००,०००
➡️येथे खरेदी किंमत > विक्री किंमत
म्हणून,
तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
तोटा = ६२,५०,००० – ६०,००,०००
तोटा = ₹ २,५०,०००
➡️ शेकडा तोटा = (तोटा / खरेदी किंमत) १००
शेकडा तोटा
= ( २,५०,०००/६२,५०,०००) १००
= ( २५ / ६२५) १००
= ( १/२५ ) १००
= ४
➡️ म्हणून या संपूर्ण व्यवहारात मनीषला ४% तोटा झाला.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

