✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९१ ✍️
अंजूचे आजचे वय मंजूच्या तीन वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघींच्या सध्याच्या वयाची बेरीज १९ वर्षे असेल तर अंजूचे आजचे वय काढा.
➡️ उत्तर :-
मंजुचे तीन वर्षांपूर्वीचे वय x वर्षे मानू.
➡️ म्हणून,
अंजूचे आजचे वय = ३x वर्षे
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
३x + (x + ३ ) = १९
४x = १९ – ३
४x = १६
x = १६ / ४
x = ४
➡️ म्हणून,
अंजूचे आजचे वय = ३x = ३ × ४ = १२ वर्षे.
➡️ म्हणून अंजूचे आजचे वय १२ वर्षे आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

