✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९५ ✍️
तीन संख्यांची बेरीज १०२ आहे. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर २ : ३ आहे तर दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर ६ : ७ आहे. तर दुसरी संख्या कोणती?
➡️ उत्तर :-
पहिली संख्या : दुसरी संख्या = २ : ३ …..(i)
दुसरी संख्या : तिसरी संख्या = ६ : ७ …..(ii)
➡️ म्हणून,
पहिली संख्या : दुसरी संख्या = १२ : १८…..(i वरून)
दुसरी संख्या : तिसरी संख्या = १८ : २१…..(ii वरून)
➡️ म्हणून,
पहिली संख्या : दुसरी संख्या : तिसरी संख्या = १२ : १८ : २१
समानपट x मानू.
➡️ म्हणून,
पहिली संख्या = १२x
दुसरी संख्या = १८x
तिसरी संख्या = २१x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
१२x + १८x + २१x = १०२
५१x = १०२
x = १०२/५१
x = २
➡️ म्हणून,
दुसरी संख्या = १८x = १८ × २ = ३६
म्हणून ती दुसरी संख्या ३६ आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

