✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४६ ✍️
हितेश आणि मितेश एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने निघाले. हितेशचा वेग ४.५ किमी प्रतितास आणि मितेशचा वेग ५ किमी प्रतितास असेल तर किती वेळाने ते एकमेकांपासून तीन किमी अंतरावर असतील?
➡️उत्तर :-
हितेशचा चालण्याचा वेग = ४.५ किमी प्रतितास
मितेशचा चालण्याचा वेग = ५ किमी प्रतितास
➡️ म्हणून,
दोघांच्या चालण्याच्या वेगातील फरक = ५ – ४.५ = ०.५ किमी प्रतितास
म्हणजे एका तासात त्या दोघे एकमेकांपासून ०.५ किमी अंतरावर असतील.
➡️ म्हणून एकमेकांपासून ३ किमी अंतरावर असण्यासाठी लागणारा वेळ
= ३ / ०.५
= ३० / ५
= ६ तास
➡️म्हणून ते सहा तासांनी एकमेकांपासून तीन किमी अंतरावर असतील.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

