✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९८ ✍️
एक टाकी १८ तासात पूर्ण भरते. परंतु तिच्या तळाशी छिद्र पडल्याने तिला पूर्ण भरण्यासाठी आता ३० तास लागतात. जर ती टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती रिकामी होण्यासाठी किती तास लागतील?
➡️ उत्तर :-
ती टाकी x तासांत रिकामी होते असे मानू.
➡️ म्हणून,
एका तासात ती टाकी १/x एवढी रिकामी होते.
छिद्र पडलेले नसताना ती टाकी १८ तासात भरते.
➡️ म्हणून,
ती टाकी एका तासात १/१८ इतकी भरते.
छिद्र पडले म्हणून ती टाकी आता ३० तासात भरते.
➡️ म्हणून,
ती टाकी एका तासात १/३० इतकी भरते.
टाकी भरण्यातील हा फरक टाकीला झालेल्या त्या छिद्रामुळे पडला आहे.
म्हणजेच , एका तासात ती टाकी [(१/१८)-(१/३०)] इतकी रिकामी होते.
➡️ म्हणून,
(१/x) = (१/१८) – (१/३०)
(१/x) = (५/९०) – (३/९०)
(१/x) = २/९०
१/x = १/४५
➡️ म्हणून,
x = ४५ तास
म्हणून ती टाकी रिकामी होण्यास ४५ तास लागतील.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

