✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०० ✍️
मराठी शाळा व मराठी भाषा संवर्धन यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या एकूण व्हाट्सअप समूहापैकी एक दशांश समूह हे मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आहेत. त्यातून उरलेल्या समूहाच्या एक तृतीयांश समूह जिल्हानिहाय/ विभागनिहाय आहेत. त्यानंतर उर्वरित समूहाच्या एक दशांश समूह आरोग्यविषयक बाबींशी संबंधित आहेत. जेवढे आरोग्यविषयक समूह आहेत त्याच्या दुप्पट समूह प्रशासन आणि नियोजनाशी संबंधित आहेत. विविध क्षेत्र आणि विषयाला समर्पित (जसे की पाककला, गणित, रंगभूमी, संतवाणी वगैरे) असे ४२ समूह आहेत. तर ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे व्हाट्सअपवर एकूण किती समूह आहेत?
➡️ उत्तर :-
ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे एकूण x समूह आहेत असे मानू.
➡️ म्हणून,
मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे समूह = x/१०
मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे समूह वगळून ज्ञामप्रचे राहिलेले समूह = x – (x/१०) = (१०x – x) / १० = ९x / १०
➡️ म्हणून,
जिल्हा / विभागनिहाय समूह = (१/३)(९x/१०) = ३x/१०
जिल्हा / विभागनिहाय समूह वगळून ज्ञामप्रचे राहिलेले समूह
= (९x/१०) – (३x/१०) = (९x – ३x) / १० = ६x / १०
➡️ म्हणून,
आरोग्यविषयक बाबींशी संबंधित समूह = (१/१०)(६x/१०) = ६x/१००
प्रशासन आणि नियोजनाचे समूह = २(६x/१००) = १२x/ १००
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = (x/१०) + (३x/१०) + ( ६x/१००) + ( १२x/१००) + ४२
१००x = १०x + ३०x + ६x + १२x + ४२००…….(समीकरणास १०० ने गुणून)
१००x = ५८x + ४२००
१००x – ५८x = ४२००
४२x = ४२००
x = ४२००/४२
x = १००
म्हणून ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे व्हाट्सअपवर एकूण १०० समूह आहेत.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

