✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०२ ✍️
सरळव्याजाने १० वर्षात बँकेत गुंतवलेली रक्कम दुप्पट झाली असेल तर त्या बँकेचा द. सा. द. शे. व्याजदर किती?
➡️ उत्तर :-
बँकेचा द. सा. द. शे. दर x तर गुंतवलेली रक्कम y मानू.
आपल्याला माहिती आहे की,
सरळव्याज = ( म × द × क)/१००
सरळव्याज गुंतविलेल्या रकमेएवढे झाले की रक्कम दुप्पट होते.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
y = ( y × x × १०)/१००
➡️ म्हणून,
x = ( १०० × y )/( y × १०)
x = १०
➡️ म्हणून त्या बँकेचा व्याजदर द. सा. द. शे. १० आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

