✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०४ ✍️
चक्रवाढव्याजाने काही ठराविक रक्कम ६ वर्षात तिप्पट होते तर ती रक्कम चक्रवाढ व्याजानेच नऊपट होण्यास किती वर्षे लागतील?
➡️ उत्तर :-
आपल्याला माहिती आहे की ,
रास = मुद्दल [ १ + ( दर/१००)] ^मुदत
मुद्दल x रुपये मानू.
➡️ म्हणून,
रास = ३x रुपये
➡️ म्हणून,
३x = x[ १ + ( दर/१००)] ^६
३ = [ १ + ( दर/१००)] ^६…….(i)
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
९x = x [ १ + ( दर/१००)] ^मुदत
९ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत
३^२ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत
{[ १ + ( दर/१००)] ^६ }^२ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत …(i वरून)
[ १ + ( दर/१००)] ^१२ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत
➡️म्हणून,
मुदत = १२ वर्षे
➡️चक्रवाढ व्याजाने ती रक्कम नऊपट होण्यास १२ वर्षे लागतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

