✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०६ ✍️
आज गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२०. गेल्या वर्षी याच तारखेला गणिताशी गट्टीचा पहिला प्रश्न विचारला गेला तर त्या तारखेला कोणता वार होता?
➡️ उत्तर :-
सामान्य वर्षात ३६५ दिवस असतात म्हणजे ५२ आठवडे अन एक दिवस.
➡️म्हणून,
सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार १ दिवसांनी पुढे जातो अथवा मागील वर्षी त्याच तारखेला वार एक दिवसाने मागे जातो.
लीप वर्षात ३६६ दिवस असतात म्हणजे ५२ आठवडे अन २ दिवस.
➡️म्हणून,
लीप वर्षांत दोन दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार २ दिवसांनी पुढे जातो अथवा मागील वर्षी त्याच तारखेला वार २ दिवसांनी मागे जातो.
२०२० हे वर्ष लीप वर्ष आहे.
➡️ म्हणून,
१३ ऑगस्ट २०२० ला गुरुवार आहे. त्यामुळे १३ ऑगस्ट २०१९ रोजी मंगळवार होता.
➡️ म्हणून गणिताशी गट्टीचा पहिला प्रश्न मंगळवारी विचारला गेला.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

