✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०८ ✍️
x या संख्येला ५ ने भागले तर बाकी ३ उरते. जर ३x ला ५ नेच भागले तर बाकी किती उरेल?
➡️ उत्तर :-
आपल्याला माहिती आहे की ,
भाज्य = भाजक × भागाकार + बाकी
भागाकार आपण y मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = ५y + ३………(i)
➡️ म्हणून,
३x = १५y + ९ ………(समी. i ला ३ ने गुणून)
३x = १५y + ५ + ४
३x = ५ ( ३y + १) + ४
➡️भाज्य = भाजक × भागाकार + बाकी या समिकरणाशी तुलना करून
३x ला ५ ने भागल्यावर बाकी ४ उरते.
➡️ म्हणून ३x ला ५ नेच भागले तर बाकी ४ उरेल.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

