✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११० ✍️
एका वर्गातील ३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची सरासरी १६ वर्षे आहे. वर्गशिक्षक वगळता वयाची सरासरी १ ने कमी होते. तर वर्गशिक्षकांचे वय किती?
➡️ उत्तर :-
वर्गशिक्षकांचे वय x वर्षे मानू.
आपल्याला माहिती आहे की,
सरासरी = सर्व पदांची बेरीज / पदांची एकूण संख्या
➡️ म्हणून,
३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची बेरीज
= ( ३१ × १६
= ४९६ वर्षे ……….(i)
वर्गशिक्षक वगळता मुलांच्या वयाची बेरीज
= ३० × १५
= ४५० वर्षे ……(ii)
➡️ म्हणून,
x = ४९६ – ४५० …..(समीकरण i व ii वरून)
x = ४६ वर्षे
➡️ म्हणून वर्गशिक्षकांचे वय ४६ वर्षे आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

