✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११५ ✍️
राजेश नदीच्या प्रवाहाच्या दिशेने ९ किमी प्रतितास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ५ किमी प्रतितास या वेगाने नाव वल्हवतो तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.
➡️ उत्तर :-
नावेचा संथ पाण्यातील वेग x किमी प्रतितास तर नदीच्या प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू.
➡️ म्हणून,
नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग = ( x + y ) किमी प्रतितास
नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = ( x – y ) किमी प्रतितास
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x + y = ९ ………….(i)
x – y = ५ …………….(ii)
➡️ समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करू.
x + y = ९
– x – y = ५
(-) (+) (-)
—————————
२y = ४
∴ y = ४/२
∴ y = २ किमी प्रतितास
➡️ म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग २ किमी प्रतितास आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

