✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२० ✍️
जगनने एक मोबाईल खरेदी केला आणि मगनला २०% नफ्याने विकला. मगनने तो मोबाईल छगनला २०% तोट्याने ९६०० रुपयांला विकला तर जगनने तो मोबाईल किती रुपयांला खरेदी केला होता?
➡️ उत्तर :-
जगनने मोबाईल x रुपयांना खरेदी केला असे मानू.
नफा = २०%
➡️ म्हणून,
मोबाईलची विक्री किंमत
= x + x चे २०%
= x + x × २०/१००
= x + x/५
= ( ५x + x )./५
= ६x/५
➡️ म्हणून,
जगनने मगनला ६x/५ रुपयांना मोबाईल विकला.
तोटा = २०%
➡️ म्हणून,
मोबाईलची विक्री किंमत
= (६x/५) – (६x/५) चे २०%
= (६x/५) – ( ६x/५)(२०/१००)
= (६x/५) – (६x/५)(१/५)
= (६x/५) – (६x/२५)
= (३०x – ६x)/२५
= २४x/२५
➡️ म्हणून,
मगनने छगनला २४x/२५ रुपयांना मोबाईल विकला.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
२४x/२५ = ९६००
∴ x = ९६०० × २५/२४
∴ x = ४०० × २५
∴ x = १०००० रूपये
➡️ म्हणून जगनने तो मोबाईल १०००० रुपयांना खरेदी केला होता.
©अजित तिजोरे – ८०९७६७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

