✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२७ ✍️
परीक्षेत विशालला एका संख्येला २१ ने गुणायचे होते परंतु त्याने १२ ने गुणल्यामुळे त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा १८९ ने कमी आले. तर ती संख्या कोणती?
➡️ उत्तर :-
ती संख्या x आहे असे मानू.
त्या संख्येला २१ ने गुणून येणारा गुणाकार = २१x
त्या संख्येला १२ ने गुणून येणारा गुणाकार = १२x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
२१x – १२x = १८९
∴ ९x = १८९
∴ x = १८९ / ९
∴ x = २१
∴ ती संख्या २१ आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

