✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.५२ ✍️
एका क्रिकेट सामन्यात अभिजित ने चंदनच्या दुप्पट धावा केल्या. चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण २:३ आहे. जर तिघांनी मिळून त्या सामन्यात २७० धावा काढल्या तर चंदनने किती धावा केल्या?
➡️उत्तर :-
अभिजित आणि चंदन यांच्या धावांचे प्रमाण = २:१……(i)
चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण = २:३ …….(ii)
अभिजित आणि चंदन यांच्या धावांचे प्रमाण = ४:२……(iii) …(i वरून)
➡️ समीकरण (ii) आणि (iii) वरून,
अभिजित , चंदन आणि अमोल यांच्या धावांचे प्रमाण = ४:२:३
समानपट x मानू.
➡️ म्हणून,
अभिजितच्या धावा = ४x
चंदनच्या धावा = २x
अमोलच्या धावा = ३x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
४x + २x + ३x = २७०
९x = २७०
x = २७०/९
x = ३०……….(iv)
➡️म्हणून,
चंदनच्या धावा = २x
= २ × ३० ………(iv वरून)
= ६०
म्हणून चंदनने त्या क्रिकेट सामन्यात ६० धावा केल्या.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

